शासकीय योजनांचा लाभ नागरिकांतील शेवटच्या घटकांपर्यंत पोहचवावा : ना. मुश्रीफ


शासकीय योजनांचा लाभ नागरिकांतील शेवटच्या घटकांपर्यंत पोहचवावा

– सिद्धनेर्ली’ येथील छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व शिबिरात मंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रतिपादन

​कागल : प्रतिनिधी
माझ्या विधानसभा मतदार संघात ‘पंतप्रधान सूर्य घर योजना व ‘मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते योजना या दोन्ही ही योजना प्रभावीपणे राबविणार आहे. सध्या नागरिकांना राज्य शासनाच्या शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान अभियान राबविण्यात आले आहे. याचा प्रत्यक्ष लाभ त्या नागरिकांतील शेवट घटकांपर्यंत पोहचविण्यासाठी अधिकारी व कर्मचारी वर्गाने दक्ष राहून काम करावे. असे प्रतिपादन वैद्यकिय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ केले.

सिध्दनेर्ली (ता. कागल) येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. अभियानाचे आयोजन शिबिराचे आयोजन कागल तहसीलदार कार्यालयाच्यावतीने करण्यात आले होते. यावेळी ‘शाहू ग्रुप’ चे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, ‘गोकुळ’ चे संचालक अंबरिषसिंह घाटगे, पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी अमोल येडगे, प्रांताधिकारी प्रसाद चौगले, तहसीलदार अमरदीप वाकडे उपस्थित होते. यावेळी नागरिकांना एकाच ठिकाणी विविध शासकीय योजनांचा लाभ व दाखले देण्याचे
​अभियान पार पडले.

समरजितसिंह घाटगे म्हणाले, कॅन्सर सारख्या गंभीर आजारामुळे अनेक महिलांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. सध्या शासनाने लसीकरणाची मोहिम हाती घेतली आहे. त्यामुळे अशा दुर्धर आजारांना आळा बसू शकेल. पारंपारिक शेतीऐवजी ‘एआय’ तंत्रज्ञान आले आहे. त्याचा वापर करून शेती उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यासाठी आंम्ही प्रोत्साहन देत आहोत. ‘मॉल’ सारख्या भांडाराना जिल्हा बँक, राजे बँक आर्थिक सहकार्य करते. त्यामुळं बचत गटाचा उत्पादित माल विक्रीसाठी स्वतंत्र विभाग असणे बंधनकारक असणे गरजेचे आहे.

विभागीय आयुक्त श्री पुलकुंडवार म्हणाले, नागरिकांना सर्व योजनांची माहिती व दाखले एकाच छताखाली मिळावी. यासाठी हे अभियान आहे. पुढील महिन्यापर्यंत हे अभियान राबविले जाणार आहे. अधिकाऱ्यांनी लोकांपर्यंत जावून योजना राबवावी. सातबारा अध्यावत करण्यासाठी लोकांनीही दक्ष राहिले पाहिजे. पुढे आता मतदार यादी अद्यावत करणे व जणगणना ही दोन्ही अभियान राबविली जाणार असल्याचे सांगितले.

यावेळी जिल्हाधिकारी अमोल यडगे, ‘गोकुळ’ चे संचालक अंबरिषसिंह घाटगे, गटविकासअधिकारी कुलदीप बोंगे, दिनकर वाडकर, सरपंच दत्तात्रय पाटील यांची भाषणे झाली.
याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्या सुयशा घाटगे, कागलच्या सभापती सौ. सुवर्णा पाटील, राज्य पणन संस्थेच्या संचालिका धनश्रीदेवी घाटगे, उपसभापती डॉ. इंद्रजीत पाटील, नायब तहसीलदार सुशांत गिरगावकर, राजे बँकेचे माजी चेअरमन एम. पी. पाटील, प्रा. सुनील मगदूम, मंडल अधिकारी संदीप पाटील, आरोग्य, शिक्षण, व महसूल विभागातील अधिकारी, विविध गावचे सरपंच व ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी महिलांच्या गर्भाशय मुखाचा कॅन्सर प्रतिबंध (HPV) लसीकरणाचा प्रारंभ करण्यात आला. तसेच विविध महसुली दाखले, पाणंद रस्ते प्रोत्साहन, अअभिलेखे, आरोग्य शिबीर, वारता नोंदी, शेती औजारे वाटप, शिधापत्रिका वाटप, विविध प्रमाणपत्रे यांचे वाटप प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

प्रास्ताविक तहसीलदार अमरदीप वाकडे यांनी केले, सुत्रसंचालन अमृता पोवार यांनी केले तर आभार कुलदीप बोंगे योनी मानले.
……….

आंम्ही एकत्र आलो आहोत, निर्धास्त रहा !

शासनाच्या योजना राबविताना पूर्वी प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी दचकून राहत असत. लोकांची कामे करताना कांहीवेळा अडचण निर्माण होत असे. सध्या मी, मुश्रीफसाहेब व संजयबाबा घाटगे एकत्र आलो आहोत. आता भित्ती घ्यायची गरज नाही. लोकांची चांगली कामे करा. निर्धास्त रहा. असे समरजितसिंह घाटगे यांनी आपल्या भाषणात मिष्किलपणे उल्लेख करताच सभागृहात हास्य उमटले.
……………..

 

 

 


0
कृपया वोट करा

मराठवाडा टुडेच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!