बिद्री साखर कारखान्याच्यावतीने गुरुवारी रक्तदान शिबीर
बिद्री : प्रतिनिधी
व्हिजन मराठी न्यूज
………………
बिद्री (ता. कागल) येथील श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या वतीने उद्या, गुरुवार दि. ३० एप्रिल रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सामाजिक बांधिलकी जपत कारखान्याने या विशेष उपक्रमाचे नियोजन केले आहे.
हे शिबीर कारखाना कार्यस्थळावरील ‘शुगर हाऊस’ (टाईम ऑफिस जवळ) येथे पार पडणार आहे. सकाळी ९ ते दुपारी ३ या वेळेत हे रक्तदान शिबीर सुरू राहील.
समाजात रक्ताची गरज असलेल्या रुग्णांना वेळेत मदत मिळावी, या उद्देशाने हे शिबीर होत आहे. तरी कारखाना परिसरातील नागरिक, सभासद, युवक आणि कामगार बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रक्तदान करावे, असे आवाहन बिद्री कारखाना प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
…………………
Views: 98












