‘कोजिमाशि’ पतसंस्थेला ५ कोटी ३० लाखांचा नफा
एन.पी.ए. शून्य टक्क्यावर, ६६५ कोटींच्या ठेवी, वार्षिक उलाढाल २७५१ कोटीवर
कोल्हापूर: प्रतिनिधी ( सागर सरदेसाई )
व्हिजन मराठी न्यूज
………………
कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवकांच्या पतसंस्थेला सन २०२५-२६ आर्थिक वर्षात ५ कोटी ३० लाख इतका विक्रमी नफा झाला आहे, अशी माहिती पतसंस्थेचे चेअरमन अविनाश चौगले व व्हा. चेअरमन ऋतुजा पाटील यांनी दिली.
चेअरमन अविनाश चौगले म्हणाले की, शिक्षकनेते दादासाहेब लाड यांच्या मार्गदर्शनानुसार काटकसरीचा व पारदर्शक कारभार करून कर्जाची वसुली चिकाटीने करून एन.पी.ए. शून्य टक्क्यावर आणण्यात आमचे संचालक मंडळ यशस्वी ठरले आहे.
यावेळी बोलताना दादासाहेब लाड म्हणाले, दरवर्षीप्रमाणे याही वर्षी संस्थेस विक्रमी नफा झाला असून यातून सभासदांना जास्तीत जास्त लाभ देण्याचा आमचा मानस आहे. त्यानुसार जानेवारीपासून सुकन्या ठेव योजना व कन्यादान साडी योजना अंतर्गत दिल्या जाणाऱ्या भेट रकमेत वाढ करून यापुढे ४००० रूपये प्रमाणे लाभ दिला जाईल.
‘कोजिमाशि’ पतसंस्थेच्या आर्थिक उलाढालीची देदीप्यमान घौडदौड
गेल्या आर्थिक वर्षात संस्थेने ५४२ कोटी रुपयांचे कर्ज वितरण केले आहे. ६६५ कोटींच्या ठेवी असून २६९ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. तसेच संस्थेकडे ८२२ कोटींचे खेळते भांडवल असून २७५१ कोटींची वार्षिक उलाढाल केली आहे. संस्थेस ५ कोटी ३० लाख इतका नफा झाला आहे. संस्थेने नेहमीच २० ते २५ टक्के इतका विक्रमी लाभांश दिला आहे. संस्था ५० लाखांपर्यंत प्रतिसभासद कर्ज वितरित करीत आहे. यापैकी ६ लाख रुपये ९% व्याजदराने तर ४४ लाख रुपये १०% व्याजदराने कर्ज दिले जात आहे.
पत संस्था पूर्ण संगणकीयकृत होणार
येणाऱ्या काळात कोजिमाशि पतसंस्था ही डिजीटल लायझेशन होत आहे. कोजिमाशि ॲपच्या माध्यमातून सभासदांपर्यंत थेट पोहचण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत. सभासदांच्या खात्यावरील संपूर्ण माहिती त्यांना यातून मिळत आहे. येणाऱ्या काही दिवसांत ॲपचा वापर करून पैसे ट्रान्सफर करण्याचे आर. टी. जी. एस. व इतर मार्ग यातून निर्माण होणार आहेत. सभासदांना याचा चांगला लाभ होणार आहे.
सभासदांना जास्तीत जास्त लाभ देणार
कोजिमाशि पतसंस्थेस विक्रमी नफा झाला असून यातून सभासदांना जास्तीत जास्त लाभ देण्याचा आमचा मानस आहे. त्यानुसार जानेवारीपासून सुकन्या ठेव योजना व कन्यादान साडी योजना अंतर्गत दिल्या जाणाऱ्या भेट रकमेत वाढ करून यापुढे ४००० रुपये प्रमाणे लाभ दिला जाईल. यापुढे ही संस्था अधिक प्रगतीच्या दिशेने वाटचाल करेल, असा विश्वास दादासाहेब लाड यांनी व्यक्त केला.
यावेळी व्हा. चेअरमन ऋतुजा पाटील, संचालक बाळ डेळेकर, राजेंद्र रानमाळे, डॉ. दत्तात्रय घुगरे, अनिल चव्हाण, उत्तम पाटील, मदन निकम, राजाराम शिंदे, दिपक पाटील, सचिन शिंदे, प्रकाश कोकाटे, श्रीकांत पाटील, सुभाष खामकर, मनोहर पाटील, राजेंद्र पाटील, जितेंद्र म्हैशाळे, शरद तावदारे, प्रकाश कोकाटे, पांडुरंग हळदकर, श्रीकांत कदम, शितल हिरेमठ, मुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत कुरडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी उत्तम कवडे उपस्थित होते.
……………..












