दूध उत्पादक हेच गोकुळचे खरे मालक; स्वर्गीय आनंदराव पाटील चुयेकर यांच्या विचारांवरच वाटचाल : माजी चेअरमन विश्वास पाटील कोल्हापूर : प्रतिनिधी व्हिजन मराठी न्यूज …………………….. “दूध उत्पादक हाच गोकुळचा खरा मालक आणि खरी ताकद आहे. गोकुळचे शिल्पकार, माजी चेअरमन स्वर्गीय आनंदराव पाटील चुयेकर यांच्या विचारांच्या तालमीत आम्ही घडलेले कार्यकर्ते आहोत. त्यांनी घालून दिलेले सहकाराचे संस्कार, कामाची पद्धत आणि दूध उत्पादकांना केंद्रस्थानी ठेवण्याचा विचार हाच आमच्या कार्याचा पाया आहे. त्या विचारांवरच गोकुळची सर्वांगीण प्रगती करणे आणि दूध उत्पादकांचे हित जपणे, हीच आमची भूमिका राहील,” असे गोकुळचे माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांनी सांगितले. गोकुळ दूध संघाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलताना त्यांनी सांगितले की, विविध दूध उत्पादक संस्थांनी माझ्यावर व्यक्त केलेला विश्वास हा माझ्यासाठी मोठा सन्मान असून त्याचबरोबर ती मोठी जबाबदारी आहे. या विश्वासाला पात्र ठरत गोकुळच्या चौफेर प्रगतीसाठी सातत्याने काम करणे, दूध उत्पादक सभासदांच्या अपेक्षा पूर्ण करणे आणि संस्थेची विश्वासार्हता अधिक बळकट करणे हेच माझे ध्येय राहील. ठराव दाखल करण्यासाठी गेलो असताना माझ्या समवेत असलेल्या सहकाऱ्यांनी माझ्याविषयी व्यक्त केलेली मते ही त्यांच्या मनातील आदर, आत्मीयता आणि अनेक वर्षांच्या स्नेहपूर्ण सहवासातून व्यक्त झालेल्या भावना आहेत. त्या वक्तव्याचा गैरसमज करुन घेऊन नये. त्या विषयावर अधिक भाष्य करण्यापेक्षा दूध उत्पादकांनी माझ्यावर दाखविलेला विश्वास सार्थ ठरविणे आणि गोकुळच्या प्रगतीसाठी सातत्याने काम करणे हेच माझ्यासाठी अधिक महत्त्वाचे आहे. ते पुढे म्हणाले, “गोकुळ दूध संघाच्या जडणघडणीत गोकुळचे शिल्पकार स्वर्गीय आनंदराव पाटील चुयेकर यांचे योगदान अतुलनीय आहे. त्यांच्या कार्याची आणि विचारांची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक कार्यकर्ते घडले. सहकाराची शिस्त, पारदर्शकता आणि दूध उत्पादकांना केंद्रस्थानी ठेवण्याची परंपरा त्यांनी रुजवली. आजही गोकुळची वाटचाल त्याच विचारांवर सुरू आहे. स्वर्गीय चुयेकर साहेबांच्या विचारांचा वारसा जपण्यासाठी अनेक ज्येष्ठ नेते, माजी पदाधिकारी, संचालक, कर्मचारी, कार्यकर्ते, हितचिंतक, दूध संस्था आणि दूध उत्पादक यांनी वेळोवेळी मोलाचे योगदान दिले आहे. त्या परंपरेत मलाही काम करण्याची संधी मिळाली, हे मी माझे भाग्य समजतो. भविष्यातही त्यांनी घालून दिलेल्या सहकाराच्या मूल्यांवर आणि दूध उत्पादक-केंद्रित विचारांवरच गोकुळची प्रगती अधिक सक्षम करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. गोकुळच्या वाटचालीत ज्येष्ठ नेते, माजी पदाधिकारी, संचालक, दूध उत्पादक, ग्राहक, दूध संस्था, कर्मचारी, कार्यकर्ते आणि हितचिंतक यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. गोकुळची प्रगती ही सर्वांच्या सामूहिक प्रयत्नातूनच शक्य झाली आहे आणि पुढील काळातही सर्वांना सोबत घेऊनच संस्थेची प्रगती साधली जाईल. यावेळी बोलताना विश्वास पाटील म्हणाले, “कोणाशी तुलना करणे किंवा स्वतःला मोठे समजणे हा माझा स्वभाव नाही. गोकुळ ही कोणत्याही एका व्यक्तीची संस्था नसून ती दूध उत्पादक सभासदांची संस्था आहे. मी स्वतःला कधीही गोकुळचा ‘बाप’ मानलेले नाही आणि तसा दावा करण्याचाही प्रश्न नाही. दूध उत्पादक हेच गोकुळचे खरे मालक आहेत. त्यांच्या विश्वासाला पात्र ठरत सर्वांना सोबत घेऊन गोकुळ अधिक सक्षम करणे, दूध उत्पादकांचे हित जपणे आणि संस्थेची प्रगती करणे, यासाठी आम्ही सातत्याने काम करत राहू.” शेवटी त्यांनी सांगितले की, गोकुळची ओळख ही सहकार, पारदर्शकता, गुणवत्ता आणि दूध उत्पादकांच्या विश्वासावर उभी आहे. हा विश्वास अधिक दृढ करणे, सर्व घटकांना सोबत घेऊन संस्थेची प्रगती करणे आणि स्वर्गीय आनंदराव पाटील चुयेकर यांनी घालून दिलेल्या विचारांचा वारसा पुढे नेणे, हेच आमचे ध्येय राहील.


दूध उत्पादक हेच गोकुळचे खरे मालक; स्वर्गीय आनंदराव पाटील चुयेकर यांच्या विचारांवरच वाटचाल : माजी चेअरमन विश्वास पाटील

कोल्हापूर : प्रतिनिधी
व्हिजन मराठी न्यूज
……………………..

“दूध उत्पादक हाच गोकुळचा खरा मालक आणि खरी ताकद आहे. गोकुळचे शिल्पकार, माजी चेअरमन स्वर्गीय आनंदराव पाटील चुयेकर यांच्या विचारांच्या तालमीत आम्ही घडलेले कार्यकर्ते आहोत. त्यांनी घालून दिलेले सहकाराचे संस्कार, कामाची पद्धत आणि दूध उत्पादकांना केंद्रस्थानी ठेवण्याचा विचार हाच आमच्या कार्याचा पाया आहे. त्या विचारांवरच गोकुळची सर्वांगीण प्रगती करणे आणि दूध उत्पादकांचे हित जपणे, हीच आमची भूमिका राहील,” असे गोकुळचे माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांनी सांगितले.

गोकुळ दूध संघाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलताना त्यांनी सांगितले की, विविध दूध उत्पादक संस्थांनी माझ्यावर व्यक्त केलेला विश्वास हा माझ्यासाठी मोठा सन्मान असून त्याचबरोबर ती मोठी जबाबदारी आहे. या विश्वासाला पात्र ठरत गोकुळच्या चौफेर प्रगतीसाठी सातत्याने काम करणे, दूध उत्पादक सभासदांच्या अपेक्षा पूर्ण करणे आणि संस्थेची विश्वासार्हता अधिक बळकट करणे हेच माझे ध्येय राहील.

ठराव दाखल करण्यासाठी गेलो असताना माझ्या समवेत असलेल्या सहकाऱ्यांनी माझ्याविषयी व्यक्त केलेली मते ही त्यांच्या मनातील आदर, आत्मीयता आणि अनेक वर्षांच्या स्नेहपूर्ण सहवासातून व्यक्त झालेल्या भावना आहेत. त्या वक्तव्याचा गैरसमज करुन घेऊन नये. त्या विषयावर अधिक भाष्य करण्यापेक्षा दूध उत्पादकांनी माझ्यावर दाखविलेला विश्वास सार्थ ठरविणे आणि गोकुळच्या प्रगतीसाठी सातत्याने काम करणे हेच माझ्यासाठी अधिक महत्त्वाचे आहे.

ते पुढे म्हणाले, “गोकुळ दूध संघाच्या जडणघडणीत गोकुळचे शिल्पकार स्वर्गीय आनंदराव पाटील चुयेकर यांचे योगदान अतुलनीय आहे. त्यांच्या कार्याची आणि विचारांची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक कार्यकर्ते घडले. सहकाराची शिस्त, पारदर्शकता आणि दूध उत्पादकांना केंद्रस्थानी ठेवण्याची परंपरा त्यांनी रुजवली. आजही गोकुळची वाटचाल त्याच विचारांवर सुरू आहे.

स्वर्गीय चुयेकर साहेबांच्या विचारांचा वारसा जपण्यासाठी अनेक ज्येष्ठ नेते, माजी पदाधिकारी, संचालक, कर्मचारी, कार्यकर्ते, हितचिंतक, दूध संस्था आणि दूध उत्पादक यांनी वेळोवेळी मोलाचे योगदान दिले आहे. त्या परंपरेत मलाही काम करण्याची संधी मिळाली, हे मी माझे भाग्य समजतो. भविष्यातही त्यांनी घालून दिलेल्या सहकाराच्या मूल्यांवर आणि दूध उत्पादक-केंद्रित विचारांवरच गोकुळची प्रगती अधिक सक्षम करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

गोकुळच्या वाटचालीत ज्येष्ठ नेते, माजी पदाधिकारी, संचालक, दूध उत्पादक, ग्राहक, दूध संस्था, कर्मचारी, कार्यकर्ते आणि हितचिंतक यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. गोकुळची प्रगती ही सर्वांच्या सामूहिक प्रयत्नातूनच शक्य झाली आहे आणि पुढील काळातही सर्वांना सोबत घेऊनच संस्थेची प्रगती साधली जाईल.

…………………………………………………………

यावेळी बोलताना विश्वास पाटील म्हणाले, “कोणाशी तुलना करणे किंवा स्वतःला मोठे समजणे हा माझा स्वभाव नाही. गोकुळ ही कोणत्याही एका व्यक्तीची संस्था नसून ती दूध उत्पादक सभासदांची संस्था आहे. मी स्वतःला कधीही गोकुळचा ‘बाप’ मानलेले नाही आणि तसा दावा करण्याचाही प्रश्न नाही. दूध उत्पादक हेच गोकुळचे खरे मालक आहेत. त्यांच्या विश्वासाला पात्र ठरत सर्वांना सोबत घेऊन गोकुळ अधिक सक्षम करणे, दूध उत्पादकांचे हित जपणे आणि संस्थेची प्रगती करणे, यासाठी आम्ही सातत्याने काम करत राहू.”

……………………………………………………………….

शेवटी त्यांनी सांगितले की, गोकुळची ओळख ही सहकार, पारदर्शकता, गुणवत्ता आणि दूध उत्पादकांच्या विश्वासावर उभी आहे. हा विश्वास अधिक दृढ करणे, सर्व घटकांना सोबत घेऊन संस्थेची प्रगती करणे आणि स्वर्गीय आनंदराव पाटील चुयेकर यांनी घालून दिलेल्या विचारांचा वारसा पुढे नेणे, हेच आमचे ध्येय राहील.

…………………………


0
कृपया वोट करा

मराठवाडा टुडेच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!