आदमापुरात ९ मार्चपासून सद्गुरू बाळूमामांचा भंडारा उत्सवास प्रारंभ : भाविकांची मांदियाळी


 

आदमापुरात ९ मार्चपासून सद्गुरू बाळूमामांचा भंडारा उत्सवास प्रारंभ : भाविकांची मांदियाळी

बिद्री : प्रतिनिधी
व्हिजन मराठी न्यूज

महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा या राज्यांतील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र आदमापूर (ता. भुदरगड) येथे सद्‌गुरू बाळूमामांचा वार्षिक भंडारा उत्सव सोमवार, दि. ९ मार्च सुरु झाला आहे. १७ मार्च या कालावधीत मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
​उत्सवाचा प्रारंभ
सोमवारी (दि. ९) सायंकाळी ७ वाजता बाळूमामा देवालय ट्रस्टचे अध्यक्ष धैर्यशील भोसले यांच्या हस्ते विधीवत ‘वीणापूजन’ करून उत्सवाचा प्रारंभ करण्यात आला आहे. अशी माहिती कार्याध्यक्ष पुंडलिक होसमणी यांनी दिली आहे.दै

नंदिन धार्मिक कार्यक्रम

​उत्सवाच्या काळात दररोज आरती, समाधिपूजन, काकडा, हरिपाठ, प्रवचन आणि कीर्तन पार पडणार आहे. तसेच दररोज रात्री ११ ते पहाटे ४ या वेळेत ‘हरिजागर’ होणार आहे.

प्रवचन आणि कीर्तन सेवा

​९ मार्च: रणजित भारमल (प्रवचन), नानासो शि. पाटील (कीर्तन) ​१० मार्च: प्रा. शशांक कोंडेकर (प्रवचन), अर्जुन जाधव (कीर्तन) ​११ मार्च: विनय कुलकर्णी (प्रवचन), विष्णू खोराटे (कीर्तन)
​१२ मार्च: नितेश रायकर (प्रवचन), मारुती देवडकर (कीर्तन) ​१३ मार्च: अशोक कौलवकर (प्रवचन), दत्तात्रय पाटील (कीर्तन) ​१४ मार्च: रामचंद्र पाटील (प्रवचन), भानुदास महाराज कोल्हापुरे (कीर्तन) ​१५ मार्च: नानासो द. पाटील (प्रवचन), बाळकृष्ण परीट (कीर्तन)

भाकणूक आणि सांगता
​१६ मार्च: पहाटे ४ ते ६ या वेळेत वाघापूर येथील कृष्णात डोणे पुजारी यांची ‘भाकणूक’ (भविष्यावाणी) होईल. त्यानंतर सकाळी १० वाजल्यापासून काल्याचे अभंग आणि महाप्रसादाचे वाटप केले जाईल.

​१७ मार्च: सकाळी ९ वाजता भव्य पालखी सोहळा निघेल आणि दुपारी ४ वाजता प्रसादाने या उत्सवाची सांगता होईल.
​सद्‌गुरू बाळूमामा देवालय समिती व आदमापूर ग्रामस्थांच्या वतीने सर्व भाविकांना या धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
……..


0
कृपया वोट करा

मराठवाडा टुडेच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!