​महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण यांना ‘गोकुळ’ मार्फत अभिवादन


महाराष्ट्राचे शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण यांना ‘गोकुळ’ मार्फत अभिवादन

को​ल्हापूर: प्रतिनिधी

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि भारताचे माजी संरक्षण मंत्री, स्व. यशवंतरावजी चव्हाण यांच्या ११३ व्या जयंतीनिमित्त कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) वतीने त्यांना भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. संघाच्या ताराबाई पार्क येथील विकासकक्ष कार्यालयात हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
​कार्यक्रमाच्या सुरुवातीला संघाचे माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
सहकार आणि ग्रामीण विकासाचा भक्कम पाया 

यावेळी बोलताना विश्वास पाटील म्हणाले की, “स्व. यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाचा भक्कम पाया रचला. सहकार चळवळीला बळ देऊन ग्रामीण भागातील सामान्य शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य निर्माण करण्याचे महान कार्य त्यांनी केले. त्यांच्या दूरदृष्टीमुळेच आज महाराष्ट्रातील सहकार क्षेत्र जगात आदर्श ठरले आहे.”

​पाटील यांनी पुढे नमूद केले की, पंचायतराज व्यवस्थेच्या माध्यमातून गावपातळीवर लोकसहभागाचा विचार त्यांनी रुजवला. आजही ग्रामीण भागाचा विकास साधताना त्यांचे विचार दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक ठरत आहेत.
​मान्यवरांची उपस्थिती
​या प्रसंगी संघाचे संचालक अजित नरके यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. एम. पी. पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन पशुसंवर्धन व्यवस्थापक डॉ. प्रकाश साळुंखे यांनी मानले.

यावेळी ​संचालक प्रकाश पाटील, बाळासो खाडे, अजित नरके. मार्केटिंग व्यवस्थापक हणमंत पाटील, संकलन व्यवस्थापक एस. व्ही. तुरंबेकर, दत्तात्रय वागरे, बाजीराव मुडूकशिवाले, अशोक पुणेकर, संभाजी पाटील, संग्राम पाटील, प्रताप पाटील, विनोद वानखेडे. ​जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील यांच्यासह संघाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
….

 

.


0
कृपया वोट करा

मराठवाडा टुडेच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!