खेबवडे येथे १६ मार्चला निकाली कुस्त्यांचे मैदान


 

खेबवडे येथे १६ मार्चला निकाली कुस्त्यांचे मैदान

– महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील आणि उत्तर प्रदेश केसरी आदिनाथ सिंह यांच्यात होणार मुख्य लढत ; मैदानात ११० नेमलेल्या लढती.

​बाचणी : प्रतिनिधी

करवीर तालुक्यातील खेबवडे येथील श्री बलभीम तालीम मंडळाच्या वतीने आणि श्री विठ्ठलाई देवीच्या यात्रेच्यानिमित्ताने सोमवार, दि. १६ मार्चला दुपारी ३ वाजता निकाली कुस्ती मैदान आयोजित करण्यात आले आहे. यावेळी महाराष्ट्र केसरी (सेनादल) पृथ्वीराज पाटील आणि उत्तर प्रदेश केसरी आदिनाथ सिंह यांच्यात होणार मुख्य लढत होणार असून मैदानात नेमलेल्या ११० लढती होणार आहेत. अशी माहिती कुस्ती मैदानाचे मुख्य संयोजक, कोल्हापूर बाजार समितीचे विद्यमान संचालक सुयोग सुभाषराव वाडकर यांनी दिली.

श्री वाडकर म्हणाले, या कुस्ती मैदानाला ५० वर्षांची परंपरा लाभली असून येथील या मैदानाने अनेक नामवंत मल्ल घडविले आहेत. बलभीम तालीम मंडळाचे अध्यक्ष सुभाषराव वाडकर यांच्या मार्गदर्शनाखाली मैदान होत आहे. ‘शाहू मैदान’, सुभाषनगर, खेबवडे येथे कुस्ती परंपरा जपत आहोत.

प्रथम क्रमांकाच्या लढतीसाठी दिड लाखाचे
​बक्षीस असून ‘महाराष्ट्र केसरी’ पृथ्वीराज पाटील (सेनादल) आणि ‘उत्तर प्रदेश केसरी’ आदिनाथ सिंह यांच्यात होणार आहे. या दोन दिग्गज मल्लांच्या लढतीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. ​तर दुसऱ्या क्रमांकासाठी ‘महाराष्ट्र चॅम्पियन’ पै. कालीचरण सोळणकर (गंगावेश) आणि ‘इंटर युनिव्हर्सिटी चॅम्पियन’ पै. विक्रम भोसले (खवसपूर) यांच्यात लढत होणार आहेत.
​अन्य लढतीत ​पै. बंटीकुमार (हरियाणा, उत्तर प्रदेश केसरी) विरुद्ध पै. सतपाल सोनटक्के (महाराष्ट्र चॅम्पियन), ​पै. पार्थ पाटील (बेळगाव, कर्नाटक चॅम्पियन) विरुद्ध पै. अभिजीत कापडे (महाराष्ट्र चॅम्पियन), ​पै. अक्षय चौगले (अर्जुनवाडा) विरुद्ध पै. तेजस मोरे (वाकरे, युवा महाराष्ट्र केसरी), ​पै. निलेश हिरूगुडे (बानगे, महाराष्ट्र चॅम्पियन) विरुद्ध पै. जय मांडवले (शेंडूर, महाराष्ट्र चॅम्पियन) अशा प्रमुख लढती होणार आहेत. याचबरोबर स्थानिक व उदयोन्मुख मल्लांनाही संधी देण्यात आली आहे.

​मैदानासाठी दूध संस्थेचे संचालक प्रशांत वाडकर
​गणपती नाथा पाटील, जयसिंगराव चौगले-वाडकर, विजयराव चौगले-वाडकर, सुभाष वाडेकर यांच्यासह ग्रामपंचायतीचे सदस्य आणि खेबवडे ग्रामस्थ यांचे सहकार्य लाभले आहे. या कुस्ती मैदानाचा लाभ घ्यावा. असे श्री वाडकर यांनी केले आहे.
………..

 


0
कृपया वोट करा

मराठवाडा टुडेच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!