मुरगूड येथे ‘अंबरिषसिंह घाटगे चषक’ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन


मुरगूड येथे ‘अंबरिषसिंह घाटगे चषक’ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

​विद्री : प्रतिनिधी (सागर सरदेसाई)

‘गोकुळ’ चे संचालक अंबरिषसिंह प्रेमी मुरगूड यांच्या वतीने शहरात भव्य ‘अंबरिषसिंहदादा घाटगे चषक’ डे-नाईट क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा २६ मार्च ते २९ मार्च २०२६ या कालावधीत मुरगूड येथील मराठी शाळा पटांगणावर पार पडणार आहे.

​या स्पर्धेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे ‘एक गाव, एक टीम’ हा नियम असून, यामध्ये ग्रामीण गटातील ३ आणि शहरी गटातील १ अशा संघांचा समावेश असेल. स्पर्धेतील विजेत्या संघांना आकर्षक रोख बक्षिसे देण्यात येणार आहेत. यामध्ये प्रथम क्रमांकासाठी ३१,००० रुपये, द्वितीय क्रमांकासाठी १५,००० रुपये, तर तृतीय आणि चतुर्थ क्रमांकासाठी प्रत्येकी ५,००० रुपयांचे पारितोषिक ठेवण्यात आले आहे.

​स्पर्धेसाठी प्रवेश फी २,५०० रुपये निश्चित करण्यात आली असून, इच्छुकांनी प्रवेश फी भरण्यासाठी सर्वेश पोतदार (९२७२१६४०३३) यांच्याशी संपर्क साधावा. तसेच अधिक माहितीसाठी समाधान पोवार, भीमराव कांबळे, अविनाश आरेकर आणि रवि मिसाळ यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे
………….


0
कृपया वोट करा

मराठवाडा टुडेच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!