वाळवे खुर्द ग्रामपंचायत शालेय विद्यार्यांच्या विकासासाठी नेहमी पाठीशी : बाबासाहेब पाटील


वाळवे खुर्द ग्रामपंचायत शालेय विद्यार्यांच्या विकासासाठी नेहमी पाठीशी : बाबासाहेब पाटील

बिद्री : प्रतिनिधी

एखादी ग्रामपंचायत जेव्हा शिक्षणाला केंद्रबिंदू मानते, तेव्हा त्या गावाचे भविष्य उज्ज्वल असते. वाळवे खुर्द ग्रामपंचायतीने शाळेला आधुनिक साहित्याची मदत करून आणि विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून जे कार्य केले आहे, ते खरोखरच कौतुकास्पद आहे. ग्रामीण भागातील टॅलेंटला संधी देण्यासाठी ग्रामपंचायतीने घेतलेली ही मेहनत जिल्ह्यासाठी एक उत्तम वस्तुपाठ आहे. असे प्रतिपादन दूधसाखर बँकेचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी केले.

वाळवे खुर्द (ता. कागल) येथे ‘शाळा समृद्ध, तर गाव समृद्ध’ या ध्येयवादातून वाळवे खुर्द ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांनी राबवलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे आज विद्यामंदिर वाळवे खुर्दच्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडवली आहे. स्पर्धा परीक्षेच्या युगात इथल्या विद्यार्थ्यांनी प्रज्ञाशोध आणि नवोदयमध्ये यश मिळवण्यासोबतच, चक्क शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि आयआयटी सारख्या देशातील सर्वोच्च संस्थांपर्यंत मजल मारली आहे. शाळेच्या या देदीप्यमान शताब्दीपूर्ती वर्षाचा वारसा अधिक सक्षम करण्यासाठी ग्रामपंचायत वाळवे खुर्दच्या वतीने हनुमान जन्मोत्सवाच्या शुभ मुहूर्तावर शाळेला आवश्यक शैक्षणिक व भौतिक साहित्याचे मोठ्या प्रमाणावर वाटप करण्यात आले.

या मदतीमध्ये विद्यार्थिनींच्या आरोग्याच्या आणि स्वच्छतेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या अशा आधुनिक ‘पिंक रूम’चे उद्घाटन करण्यात आले. यामध्ये बेड आणि प्रथोमपचार साहित्य तसेच दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी पहिली ते सातवी सर्व वर्गाना लोकर्स भेट तसेच अंगणवाडीसाठी कपाटे, तिजोरी आणि इतर अद्ययावत शैक्षणिक साहित्याचा संच शाळेकडे सुपूर्द करण्यात आला. या उपक्रमामुळे शाळेच्या पायाभूत सुविधांमध्ये मोठी भर पडली असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहराच्या दर्जाचे शिक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

या प्रसंगी ‘बिद्री’ साखर कारखान्याचे संचालक मा. श्री. भूषणदादा पाटील, मा. डे सरपंच भरतदादा पाटील, युवा नेते अभिषेक पाटील, यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे नियोजन उपसरपंच हनमंत बाळसो सुतार, सरपंच सौ. संगीता बोडके ग्रामविकास अधिकारी आणि ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांनी अत्यंत नेटकेपणाने केले होते. यावेळी के. पी. बोडके बाळासाहेब पाटील ग्रामपंचायत सदस्यां विमल बोडके वनिता जाधव सुनिता माने , सर्जेराव डाफळे , मुख्याध्यापक एच. एन. पाटील सर्व शिक्षक स्टाफ शालेय कमिटी अध्यक्ष विठ्ठल पाटील सर्व सदस्यआणि इतर मोठ्या संख्येने उपस्थित होते असलेले ग्रामस्थ, युवक आणि विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावरील आनंद ग्रामपंचायतीच्या या यशस्वी उपक्रमाची पोचपावती देत होता. वाळवे खुर्दचा हा शैक्षणिक पॅटर्न आता जिल्ह्याभरात चर्चेचा विषय ठरत आहे. आभार माधुरी पाटील यांनी मानले.
……….


0
कृपया वोट करा

मराठवाडा टुडेच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!