कासारपुतळे येथे दूध उत्पादकांना २५ लाख रुपयांच्या कल्याण निधीचे वाटप; मान्यवरांचा होणार सत्कार
बिद्री : प्रतिनिधी ( सागर सरदेसाई)
व्हिजन मराठी न्यूज
………..
दूध उत्पादकांची समृद्धी, विकास, सचोटी व विश्वास ही उद्दिष्टे समोर ठेवून कार्यरत असलेल्या श्री विठ्ठल-रखुमाई सह. दूध व्यावसायिक संस्था मर्या., कासारपुतळे ( ता. राधानगरी) यांच्यावतीने सभासदांसाठी एक महत्त्वपूर्ण उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. संस्थेच्या वतीने दूध उत्पादकांनपंचवीस लाख रुपय रक्कमेच्या कल्याण निधीचे वाटप करण्यात येणार आहे. या सोहळ्याचे अध्यक्षपद दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखाना (बिद्री) चे चेअरमन व माजी आमदार मा. के. पी. पाटील भूषवणार आहेत. याच कार्यक्रमात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा गौरवपूर्ण सत्कारही मान्यवरांच्या हस्ते संपन्न होणार आहे.
या सोहळ्यासाठी सहकार आणि राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने के.डी.सी. बँकेचे संचालक श्री. ए. वाय. पाटील, गोकुळ दूध संघाचे संचालक श्री. अरूणकुमार डोंगळे, बिद्री साखर कारखान्याचे संचालक श्री. रणधीरसिंह विजयसिंह मोरे, राधानगरी पंचायत समितीचे सभापती श्री. आर. वाय. पाटील आणि उपसभापती सौ. अश्विनी चौगले यांचा समावेश आहे.
तसेच गोकुळचे संचालक श्री. अभिजित तायशेटे व प्रा. किसन चौगले, कोल्हापूर जिल्हा परिषद सदस्य श्री. सागर पांडुरंग धुंदरे, श्रीमती अमृता डोंगळे, राधानगरी पंचायत समितीच्या सदस्या सौ. वंदना बबन जाधव, सौ. अमृता अ. पाटील, सौ. पूनम यु. पाटील, सौ. मंगल शि. कांबळे आणि कासारपुतळेच्या लोकनियुक्त सरपंच श्रीमती सुनीता शं. पवार यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
याप्रसंगी बिद्री साखर कारखान्याचे संचालक श्री. सत्यजित जाधव व श्री. राहुल देसाई, जिल्हा परिषद सदस्य श्री. अरूण जाधव, सौ. संयोगिता रणधीर मोरे, सौ. रेश्मा राहुल देसाई, तसेच पंचायत समिती सदस्य श्री. सूर्यकांत पाटील, श्री. मोहन दि. पाटील, श्री. केरबा ल. पाटील, श्री. संग्राम अ. कालिकते, सरवडे ग्रामपंचायतीचे माजी सदस्य श्री. दिग्विजयसिंह द. मोरे आणि जनसेवा अध्यक्ष श्री. विश्वनाथ कु. सावंत या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात येईल.
हा सोहळा यशस्वी करण्यासाठी संस्थेचे चेअरमन व माजी सरपंच श्री. शंकरराव गो. फराकटे, व्हा. चेअरमन श्री. शांताराम नाना पाटील, संचालक श्री. विष्णू ज्ञा. निकोडे, श्री. तानाजी ग. पाटील, सौ. विमल गणपती चव्हाण, श्रीमती विठाबाई वि. पोवार, श्रीमती वनिता प्रकाश कांबळे, श्री. संभाजी कृ. सावंत, श्री. कृष्णांत ल. पाटील, श्री. हिंदूराव द. पाटील व सर्व कर्मचारी वृंद प्रयत्नशील आहेत. परिसरातील दूध उत्पादक सभासदांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
……….











