बिद्री येथील भारतमाता हायस्कूल शाळेत योग दिन साजरा


बिद्री येथील भारतमाता हायस्कूल शाळेत योग दिन साजरा

बिद्री : प्रतिनिधी (सागर सरदेसाई)
व्हिजन मराठी न्यूज
…………..

बिद्री ( ता. कागल ) येथील भारतमाता हायस्कूल या शाळेत जागतिक योग दिन साजरा करण्यात आला. योग प्रशिक्षक नवनाथ पाटील आणि क्रीडा शिक्षक एम. जी. फराकटे यांनी योगाची प्रात्यक्षिके सादर केली. ताडासन, वृक्षासन, शवासन, भुजंगासन अशी सर्वच योगासने मुलांनी आणि शिक्षकांनी शिस्तबद्धतीने केली.
यावेळी तज्ज्ञ मार्गदर्शक नवनाथ पाटील यांनी बुद्धिमत्ता, व्यक्तिमत्त्व विकासासाठी योगा, प्राणायामावर भर द्यावा, तणावमुक्त जीवन जगण्यासाठी नियमित योगासने करावीत असा मौलिक सल्ला दिला.
यावेळी टी. आर. पाटील, सी.डी. कुंभार, एस एस. फराकटे, व्ही. आर. कुंभार, एस. एस. माजगावकर, एस. एम. पाटील, जी. यु. महिंद, व्ही. डी. वारके, सतिश चव्हाण, अनिल कांबळे, राजेंद्र वारके यांच्यासह विद्यार्थी – विद्यार्थीनी उपस्थित होते.

फोटो : बिद्री येथील भारतमाता हायस्कूल शाळेत योगाचे प्रात्यक्षिक दाखवताना तज्ज्ञ मार्गदर्शक नवनाथ पाटील.
………..


0
कृपया वोट करा

मराठवाडा टुडेच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!