विकासाचा पॅटर्न सुरूच राहील : वीरेंद्र मंडलिक


विकासाचा पॅटर्न सुरूच राहील : वीरेंद्र मंडलिक

बाचणीतील रस्ते कामाचा प्रारंभ : १५ वर्षांनंतर होणार डांबरीकरण

​बाचणी  :  प्रतिनिधी   (सागर सरदेसाई)

कागल तालुक्यात गेल्या ६० वर्षांत विकासकामांच्या मजबूत धाग्याने मंडलिक कुटुंबीय व कार्यकर्ते यांच्यातील नाते अतूट राहिले आहे. लोकनेते स्व. सदाशिवराव मंडलिक यांनी सातत्याने शाश्वत विकासकामांचा आग्रह धरून ती सत्यात उतरवली आहेत. माजी खासदार प्रा. संजय मंडलिक यांनीही संसद सदस्य म्हणून ८०० कोटींचा निधी खेचून आणला. आता माझ्या रूपाने आमच्या तिसऱ्या पिढीतही विकासकामांचा हा पॅटर्न असाच सुरू राहील. असे प्रतिपादन अॅड. वीरेंद्र मंडलिक यांनी केले.

​बाचणी (ता. कागल) येथे रस्ते कामाच्या प्रारंभ प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कार्यकर्ते डी. एस. पाटील होते. यावेळी बाचणी येथील गणेश मंदिरासमोरील गल्लीच्या १५ लाखांच्या रस्ते डांबरीकरण कामाचा शुभारंभ अॅड. वीरेंद्र मंडलिक यांच्या हस्ते करण्यात आला.

​मंडलिक पुढे म्हणाले की, पालकमंत्री प्रकाश आबिटकर व प्रा. संजय मंडलिक यांच्या मार्गदर्शनाखाली माझ्या विशेष प्रयत्नातून या कामासाठी सुमारे १५ लाखांचा निधी मंजूर करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

​कार्यक्रमास जी. डी. पाटील, उपसरपंच सुमन हिंदुराव पाटील, विशाल पाटील, अन्सार नायकवडी, सर्जेराव पाटील, राजेंद्र पाटील, रंगराव जाधव, बी. ए. पाटील, उत्तम मारुती पाटील, दत्तात्रय जाधव, बाळासो खामकर, जीवन पाटील, नवनाथ पाटील, प्रदीप जाधव, जयसिंग लाड, दीपक पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. स्वागत विशाल पाटील यांनी केले, तर विठ्ठल खामकर यांनी आभार मानले.
…….


0
कृपया वोट करा

मराठवाडा टुडेच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!