आदमापुरात ९ मार्चपासून सद्गुरू बाळूमामांचा भंडारा उत्सवास प्रारंभ : भाविकांची मांदियाळी
बिद्री : प्रतिनिधी
व्हिजन मराठी न्यूज
महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा या राज्यांतील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र आदमापूर (ता. भुदरगड) येथे सद्गुरू बाळूमामांचा वार्षिक भंडारा उत्सव सोमवार, दि. ९ मार्च सुरु झाला आहे. १७ मार्च या कालावधीत मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
उत्सवाचा प्रारंभ
सोमवारी (दि. ९) सायंकाळी ७ वाजता बाळूमामा देवालय ट्रस्टचे अध्यक्ष धैर्यशील भोसले यांच्या हस्ते विधीवत ‘वीणापूजन’ करून उत्सवाचा प्रारंभ करण्यात आला आहे. अशी माहिती कार्याध्यक्ष पुंडलिक होसमणी यांनी दिली आहे.दै
नंदिन धार्मिक कार्यक्रम
उत्सवाच्या काळात दररोज आरती, समाधिपूजन, काकडा, हरिपाठ, प्रवचन आणि कीर्तन पार पडणार आहे. तसेच दररोज रात्री ११ ते पहाटे ४ या वेळेत ‘हरिजागर’ होणार आहे.
प्रवचन आणि कीर्तन सेवा
९ मार्च: रणजित भारमल (प्रवचन), नानासो शि. पाटील (कीर्तन) १० मार्च: प्रा. शशांक कोंडेकर (प्रवचन), अर्जुन जाधव (कीर्तन) ११ मार्च: विनय कुलकर्णी (प्रवचन), विष्णू खोराटे (कीर्तन)
१२ मार्च: नितेश रायकर (प्रवचन), मारुती देवडकर (कीर्तन) १३ मार्च: अशोक कौलवकर (प्रवचन), दत्तात्रय पाटील (कीर्तन) १४ मार्च: रामचंद्र पाटील (प्रवचन), भानुदास महाराज कोल्हापुरे (कीर्तन) १५ मार्च: नानासो द. पाटील (प्रवचन), बाळकृष्ण परीट (कीर्तन)
भाकणूक आणि सांगता
१६ मार्च: पहाटे ४ ते ६ या वेळेत वाघापूर येथील कृष्णात डोणे पुजारी यांची ‘भाकणूक’ (भविष्यावाणी) होईल. त्यानंतर सकाळी १० वाजल्यापासून काल्याचे अभंग आणि महाप्रसादाचे वाटप केले जाईल.
१७ मार्च: सकाळी ९ वाजता भव्य पालखी सोहळा निघेल आणि दुपारी ४ वाजता प्रसादाने या उत्सवाची सांगता होईल.
सद्गुरू बाळूमामा देवालय समिती व आदमापूर ग्रामस्थांच्या वतीने सर्व भाविकांना या धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
……..












