बेलवळे खुर्द येथे आज सायंकाळी कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन
बिद्री : प्रतिनिधी
व्हिजन मराठी न्यूज
………….
तालुका विधी सेवा समिती कागल, कागल वकील बार असोसिएशन, ग्रामपंचायत बेलवळे खुर्द आणि सर्वोदय सेवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार, दिनांक २१ एप्रिल २०२६ रोजी बेलवळे खुर्द येथे भव्य कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर सायंकाळी ७:०० वाजता भावेश्वरी मंदिर परिसर, बेलवळे खुर्द (ता. कागल) येथे संपन्न होईल.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कागल तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) न्या. ए. बी. मडके भूषवणार आहेत.
कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून कागल वकील बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. आनंदराव पां. पाटील, सचिव ॲड. अभिजित एस. सांगावकर, सदस्य ॲड. अमर गणेश पाटील, ॲड. संग्राम गुरव, ॲड. अभिजित एस. शितोळे, ॲड. रूपेश डी. वाघमारे यांच्यासह बेलवळे खुर्दचे सरपंच/प्रशासक महादजी अंकुश पाटील आणि उपसरपंच सौ. दिपाली संजय पाटील उपस्थित राहणार आहेत.
विविध विषयांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन:
शिबिरामध्ये नागरिकांना दैनंदिन जीवनातील महत्त्वाच्या कायद्यांबाबत सखोल मार्गदर्शन केले जाणार आहे. यामध्ये प्रामुख्याने:
ग्राहक संरक्षण कायदा: ॲड. श्री. आनंदराव पां. पाटील (अध्यक्ष, बार असोसिएशन)
सायबर क्राईम (Cyber Crime): श्री. गंगाधर धावटे (पोलीस निरीक्षक, कागल पोलीस ठाणे) आणि ॲड. संग्राम गुरव
बालमजुरी व बाल तस्करी (Child Labour/Trafficking): ॲड. अभिजित शितोळे
मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार (RTE Act 2009): ॲड. रूपेश दिलीप वाघमारे
कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषण न्या. ए. बी. मडके करणार असून, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. विनायक साळुंखे (निवेदक) करणार आहेत. कार्यक्रमाच्या शेवटी सामाजिक कार्यकर्ते श्री. संजय पाटील आभार प्रदर्शन करतील. या कायदेविषयक शिबिराचा लाभ बेलवळे खुर्द व परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
…………












