स्व. पांडुरंग घोडके चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने बिद्री १ मे रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन


स्व. पांडुरंग घोडके चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने
बिद्री १ मे रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन

बिद्री : प्रतिनिधी
व्हिजन मराठी न्यूज
……………

बिद्री (ता. कागल) येथील स्व. पांडुरंग घोडके चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर १ मे रोजी सकाळी ८ ते दुपारी २ या वेळेत वाळवा रोडवरील शांती हॉस्पिटल येथे पार पडणार आहे.

​या कार्यक्रमाचे उद्घाटन मुरगुड पोलीस स्टेशनच्या एपीआय क्रांती पाटील, एएसआय प्रशांत गोजारे, मंडळ अधिकारी संभाजी शिंदे आणि ग्रामपंचायत अधिकारी बी. के. कांबळे यांच्या हस्ते होणार आहे.

​रक्तदानासारख्या पवित्र कार्यातून गरजू रुग्णांना जीवनदान मिळावे आणि सामाजिक बांधिलकी जपली जावी, या उद्देशाने हे शिबिर आयोजित केले आहे. यामध्ये श्री साई ब्लड बँक यांचे सहकार्य लाभणार आहे. शांती हॉस्पिटलचे डॉ. टी. एस. हरेल, ट्रस्टचे अध्यक्ष अक्षय घोडके, सुरज पाटील आणि अमोल चौगले यांनी परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रक्तदान करावे. असे आवाहन केले आहे.
………………


0
कृपया वोट करा

मराठवाडा टुडेच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!