पावरलिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धेत ‘दूधसाखर’ चा रोहित जितकर याला राज्यस्तरावर प्रथम क्रमांक
बिद्री : प्रतिनिधी
व्हिजन मराठी न्यूज
महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग असोसिएशन,सांगली यांच्या वतीने आयोजित पंधरावी महाराष्ट्र राज्य सब-ज्युनिअर क्लासिक पावरलिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धा २०२६ दि. ११ व १२ एप्रिल रोजी आमराई ऑफिसर्स क्लब येथे उत्साहात पार पडली. या स्पर्धेत दूधसाखर महाविद्यालय, बिद्री येथील कु. रोहित विजय जितकर (बी.ए. प्रथम वर्ष) याने ६६ किलो वजनी गटात उत्कृष्ट कामगिरी करत राज्यस्तरावर प्रथम क्रमांक पटकावला.
शहाजी कॉलेज, कोल्हापूर येथे पार पडेलल्या जिल्हा पॉवरलिफ्टिंग असोसिएशन या जिल्हास्तरिय स्पर्धेत त्याने प्रभावी कामगिरी नोंदवली. या स्पर्धेत त्याने स्क्वॉट ६० किलो, बेंच प्रेस ६० किलो आणि डेडलिफ्ट १२० किलो असे एकूण २४० किलो वजन उचलत प्रथम क्रमांक मिळवला. त्याच्या या उल्लेखनीय यशामुळे त्याची निवड राष्ट्रीय सब-ज्युनिअर पावरलिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धा २०२६ साठी निवड झाली आहे.
रोहितच्या या यशाबद्दल महाविद्यालय, प्रशिक्षक व परिसरातून त्याचे सर्वत्र कौतुक होत असून, आगामी राष्ट्रीय स्पर्धेसाठी त्याला प्राचार्य डॉ.संजय पाटील व सर्व शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी यांचेकडून शुभेच्छा दिल्या .त्याला संस्था अध्यक्ष मा.आमदार के. पी. पाटील, उपाध्यक्ष मा.मनोज फराकटे, सर्व संचालक, सचिव सर्जेराव किल्लेदार यांचे प्रोत्साहन लाभले.
……….












