शक्तीपीठ मार्ग रद्द व्हावा यासाठी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांना निवेदन


शक्तीपीठ मार्ग रद्द व्हावा यासाठी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांना निवेदन

बिद्री : प्रतिनिधी
व्हिजन मराठी न्यूज
……………

शक्तीपीठ मार्ग रद्द व्हावा. या मागणीसाठी बोरवडे (ता. कागल) येथील ग्रामस्थांच्यावतीने वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना शेतकऱ्यांनी निवेदन दिले.
शेतकऱ्यांना शक्तिपीठ मार्गाची गरज नसताना, शेतकऱ्यांनी या मार्गाला विरोध केला असताना सरकार शक्तीपीठ मार्ग सुरू करण्याबाबत सकारात्मकता का दाखवत आहे? शेतकऱ्यांची भूमिका तुम्ही शासन दरबारी मांडून शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा अशी भूमिका यावेळी शेतकऱ्यांनी घेतली. शेतकऱ्यांची भूमिका शासन दरबारी मांडू असे मुश्रीफ यांनी सांगितले.
यावेळी बोरवडेचे उपसरपंच दत्तात्रय पाटील, माजी उपसरपंच विनोद वारके, तानाजी साठे, ज्ञानदेव फराकटे, संभाजी फराकटे,धनाजी फराकटे,युवराज पोवार,युवराज साठे, बाळासो चौगले यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
………

 


0
कृपया वोट करा

मराठवाडा टुडेच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!