वादळी वाऱ्याचा दिंडनेर्लीत तडाखा; युवराज मगदूम यांच्या शेतातील सोलर पॅनेलचे नुकसान


वादळी वाऱ्याचा दिंडनेर्लीत तडाखा; युवराज मगदूम यांच्या शेतातील सोलर पॅनेलचे नुकसान

बाचणी :  प्रतिनिधी (व्हिजन मराठी न्यूज)

करवीर तालुक्यातील दिंडनेर्ली परिसरात  झालेल्या जोरदार वादळी वाऱ्याने शेतीचे मोठे नुकसान केले आहे. या वादळाचा तडाखा बसून येथील प्रगतशील शेतकरी युवराज मगदूम यांच्या शेतातील कृषी सोलर पॅनेलच्या प्लेट्स उडून आणि वाकून मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

​दिंडनेर्ली पावसाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, पावसाने हुलकावणी दिली आणि त्याऐवजी विजेच्या कडकडाटासह प्रचंड वेगाने वादळी वारा सुटला. या वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की, मगदूम यांच्या शेतात बसवण्यात आलेल्या सौर ऊर्जा संचाच्या (सोलर पंप) प्लेट्सचा आधार कोलमडला आणि अनेक प्लेट्स वाकून निकामी झाल्या.

शेतकऱ्यांपुढे आर्थिक संकट:

शासकीय योजना किंवा स्वखर्चातून लाखो रुपये खर्च करून बसवलेले हे सौर पॅनेल वाऱ्यामुळे उद्ध्वस्त झाल्याने मगदूम यांचे मोठे नुकसान झाले आहे. आधीच शेती व्यवसायासमोर निसर्गाची अनेक आव्हाने असताना, आता हाताशी आलेली यंत्रणा अशा प्रकारे निकामी झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. संबंधित विभागाने या नुकसानीचा पंचनामा करून भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.

…………..


0
कृपया वोट करा

मराठवाडा टुडेच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!