मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपच्यावतीने गडहिंग्लजमध्ये फळवाटप व उत्तूरमध्ये रक्तदान शिबिर
गडहिंग्लज : प्रतिनिधी
व्हिजन मराठी न्यूज
……….
राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने गडहिंग्लज येथे उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले, तर उत्तूर येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून तब्बल १२० रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.
मंत्री पाटील यांनी वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च टाळून समाजोपयोगी उपक्रम राबवावेत, असे आवाहन केले होते. त्यांच्या या संदेशाला प्रतिसाद देत शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष व भाजप नेते राजे समरजितसिंह घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांना फळांचे वाटप करून त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी माजी नगराध्यक्षा स्वातीताई कोरी, राजे बँकेचे उपाध्यक्ष रवींद्र घोरपडे, संचालक रणजीत पाटील, माजी उपनगराध्यक्ष सुनील गुरव, शहराध्यक्ष संदीप कुरळे, अर्चना रिंगणे, सुदर्शन चव्हाण, भीमराव कोमारे, अझहर बोजगर, दिगंबर विटेकरी, सरपंच बाजीराव खोत, भिकाजी पाटील, सुजित चव्हाण यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
उत्तूर येथे आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन ज्येष्ठ कार्यकर्ते रघुनाथ कातरे यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिरात युवकांसह विविध क्षेत्रातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत रक्तदान केले. जनार्दन निऊंगरे, प्रदीप लोकरे, प्रवीण लोकरे, भास्कर भाईंगडे, मंदार हळवणकर, श्रीपती यादव, बाळासाहेब सावंत, धनाजी उत्तुरकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
……….












