शिये येथे राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन
कोल्हापूर : प्रतिनिधी
व्हिजन मराठी न्यूज
शिये (ता. करवीर) येथील श्री रामकृष्ण विवेकानंद वाचनालयाच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या १५२ व्या जयंतीनिमित्त जिल्हास्तरीय खुल्या निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. समाजात वाचन व लेखनाचे महत्त्व वाढावे आणि नवीन पिढीला महापुरुषांच्या कार्याची माहिती व्हावी, या उद्देशाने ही स्पर्धा घेतली जात आहे.
ही स्पर्धा शुक्रवार, दिनांक २६ जून २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजता श्री रामकृष्ण विवेकानंद वाचनालय, श्रीरामनगर, शिये येथे होईल. स्पर्धा एकूण तीन गटांत घेतली जाणार असून विजेत्यांना रोख रक्कम, प्रमाणपत्र व ट्रॉफी देण्यात येणार आहे.
स्पर्धेचे गट आणि विषय खालीलप्रमाणे आहेत:
लहान गट (इयत्ता ७ वी ते १० वी): ‘राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे बालपण व शिक्षण’ (प्रथम: २५०१ रु., द्वितीय: १५०१ रु., तृतीय: ५०१ रु.)
मोठा गट (इयत्ता ११ वी ते पदवीधर): ‘राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे शैक्षणिक, सामाजिक व राज्यकारभाराची कार्यपद्धती’ (प्रथम: ३५०१ रु., द्वितीय: २५०१ रु., तृतीय: १५०१ रु.)
खुला गट (सर्व नागरिकांसाठी): ‘राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना आदर्श राजा का म्हटले जाते?’ (प्रथम: ७००१ रु., द्वितीय: ५००१ रु., तृतीय: ३००१ रु.)
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी २३ जून २०२६ पूर्वी नाव नोंदणी करणे बंधनकारक आहे. जिल्ह्यातील आजी-माजी शिक्षक, प्राध्यापक, ज्येष्ठ नागरिक व विचारवंतांनीही या स्पर्धेत सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहिती व नाव नोंदणीसाठी अध्यक्ष लक्ष्मण कदम (९१७५५१९३९३), उपाध्यक्ष विठ्ठल चोपदार (९९२१४८३७५२) किंवा ग्रंथपाल मनोज ठोंबरे (९३२६२५९३९३) यांच्याशी संपर्क साधावा.
………..












