सोनाळीच्या श्रावणी दाभोळेची इस्त्रो दौऱ्यासाठी निवड


सोनाळीच्या श्रावणी दाभोळेची इस्त्रो दौऱ्यासाठी निवड

बिद्री : प्रतिनिधी
व्हिजन मराठी न्यूज

……………..

सोनाळी ( ता. कागल ) येथील श्रावणी युवराज दाभोळे या विद्यार्थिनीची भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्त्रो) च्या अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाली आहे. ती सध्या कसबा वाळवे येथील श्री नामदेवराव भोईटे माध्यमिक विद्यालयात शिकत आहे.

श्रावणीच्या प्राथमिक शिक्षणाचा पाया विद्यामंदिर सोनाळी या शाळेत घातला गेला. तिने पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात नववा तर सातवी प्रज्ञाशोध परीक्षेत जिल्ह्यात अकरावा क्रमांक मिळविला होता. याकामी तिला अध्यापक विजय पाटील अध्यापिका अनिता कुंभार यांचे मार्गदर्शन लाभले.

श्रावणीने आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात पाचवा क्रमांक मिळविला आहे. शिवाय केंद्र सरकारच्या एनएमएमएस परीक्षेतही ती शिष्यवृत्तीधारक बनली आहे. ‘ उत्तुंगतेज इस्रो ‘ परीक्षेत राज्यात सहावा क्रमांक मिळवून तिची बेंगलोर येथील इस्त्रोच्या अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाली आहे. या निवडीबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

……………….

 


0
कृपया वोट करा

मराठवाडा टुडेच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!