वाघापूर विद्यालयाचा दहावी परीक्षेचा शंभर टक्के निकाल


वाघापूर विद्यालयाचा दहावी परीक्षेचा शंभर टक्के निकाल

– वेदिका अर्जुन दाभोळे हिचा प्रथम क्रमांक

बिद्री : प्रतिनिधी
व्हिजन मराठी न्यूज
…………

वाघापूर येथील वाघापूर विद्यालय (हायस्कूल) वाघापूर या शाळेचा इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला असून, शाळेने यंदाही उज्ज्वल निकालाची परंपरा कायम राखली आहे.
या परीक्षेत वेदिका अर्जुन दाभोळे हिने ९१ टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम क्रमांक पटकावला. समीक्षा तानाजी परीट हिने ८८.२० टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक मिळविला, तर मनाली दीपक जठार हिने ८७.४० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक संपादन केला.

या यशाबद्दल मुख्याध्यापक वाय. बी. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक सी. एस. वड्ड, यु. एम. शेंडगे, एस. सी. गुरव, जी. पी. पाटील, पी. आर. कांबळे, एन. ए. गारंडा तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
तसेच श्री केदारलिंग शिक्षण प्रसारक मंडळाचे पदाधिकारी, पालक व ग्रामस्थ यांचे प्रोत्साहन लाभले.
……..


0
कृपया वोट करा

मराठवाडा टुडेच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!