‘गोकुळ’  निवडणूक : २ जुलैपर्यंत संस्था पातळीवरील ठराव दाखल करण्याची मुदत


गोकुळ’  निवडणूक : २ जुलैपर्यंत संस्था पातळीवरील ठराव दाखल करण्याची मुदत

– पंचवार्षिक निवडणुकीसाठी मतदार यादी निश्चितीचा कार्यक्रम जाहीर

कोल्हापूर : प्रतिनिधी
व्हिजन मराठी न्यूज
………………..

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात ‘गोकुळ’ दूध संघाच्या २०२६ ते २०३१ या कालावधीसाठीच्या पंचवार्षिक निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. या निवडणुकीसाठी प्रारुप मतदार यादी निश्चित करण्याचा कालबद्ध कार्यक्रम (परिशिष्ट-अ) पुणे विभागाचे जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी राजकुमार पाटील यांनी आज २५ मे रोजी जाहीर केला आहे. या अंतर्गत अर्हता दिनांक ४ एप्रिल २०२६ अशी निश्चित करण्यात आली आहे.

​जाहीर झालेल्या अधिकृत कार्यक्रमानुसार, पहिल्या टप्प्यात २६ मे ते १ जून २०२६ या कालावधीत संलग्न प्राथमिक सहकारी दूध संस्थांकडून मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठीची पत्रे तालुका सहकारी निवडणूक अधिकारी व सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था (दुग्ध), कोल्हापूर यांच्याकडे पाठवावी लागणार आहेत. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात २ जून ते १७ जून २०२६ या मुदतीत दूध संस्थांना आपल्या संस्थेच्या वतीने प्रतिनिधी नियुक्त करण्याबाबतचा ठराव निवडणूक प्राधिकरणाकडे सादर करावा लागणार आहे.

राजकीय घडामोडींना वेग:

‘गोकुळ’ दूध संघाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. जिल्ह्याच्या अर्थकारणात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या या संस्थेवर आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधी गटांनी आत्तापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली आहे.  संस्थांचे ठराव गोळा करण्याची मुदत सुरू होत असल्याने, प्राथमिक दूध संस्थांचे ठराव आपल्याच बाजूने करून घेण्यासाठी गावोगावी गुप्त बैठका आणि राजकीय हालचालींना वेग आला आहे. आगामी काळात जिल्ह्यातील प्रमुख राजकीय नेत्यांमध्ये या निवडणुकीवरून मोठी चुरस पाहायला मिळणार आहे.
………


0
कृपया वोट करा

मराठवाडा टुडेच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!