कर्तव्याला सर्वोच्च स्थान देणारे व्यक्तिमत्त्व पोलिस निरीक्षक बी. ए. तळेकर : संजयबाबा घाटगे
– शेंडूर फाटा येथे पोलिस निरीक्षक तळेकर यांच्या ४० वर्षांच्या सेवेबद्दल नागरि सत्कार
कागल : प्रतिनिधी
व्हिजन मराठी न्यूज
……………
“शासकीय सेवेत प्रामाणिकपणे काम करताना आपल्या कर्तव्याला सर्वोच्च स्थान देणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे पोलिस निरीक्षक बी. ए. तळेकर होय. पोलीस विभागात कार्यरत असताना त्यांनी शिस्त, प्रामाणिकपणा आणि जनतेप्रती असलेली बांधिलकी यांचा आदर्श निर्माण केला आहे. कायदा व सुव्यवस्था राखताना त्यांनी सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला, ही बाब कौतुकास्पद असून देशसेवा आणि पोलीस दलात पोलीस निरीक्षक म्हणून अत्यंत प्रामाणिकपणे व निस्वार्थीपणे सेवा बजावणारे बी. ए. तळेकर हे एक आदर्श आणि एकमेव अधिकारी आहेत. असे गौरवद्गार माजी आमदार संजयबाबा घाटगे यांनी काढले.
शेंडूर फाटा ता. कागल येथील आर.के.मंगल कार्यालय येथे आयोजित पोलीस निरीक्षक बी. ए. तळेकर यांच्या विशेष नागरी सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कर्नल विलास सुळकुडे होते.
कार्यक्रमास वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ,भैया माने,युवराज पाटील,अप्पर उपायुक्त शशिराज पाटोळे, पोलिस उपधिक्षक तानाजी सावंत,सहाय्यक आयुक्त सचिन पाटील, उप जिल्हाधिकारी प्रमोद कदम, पोलिस निरीक्षक गजेंद्र लोहार, पोलिस निरीक्षक विश्वास पाटील प्रमुख उपस्थित होते.
यावेळी पोलिस निरीक्षक बी. ए. तळेकर, सौ.माया तळेकर यांचा मंत्री हसन मुश्रीफ, संजयबाबा घाटगे , तानाजी सावंत यांचे हस्ते सपत्निक नागरी सत्कार करण्यात आला.
मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, पोलिस निरीक्षक बी.ए. तळेकर यांनी जे यश संपादन केले, ते आजच्या तरुण पिढीसाठी प्रेरणादायी आहे. कठीण परिस्थितीतून मार्ग काढत त्यांनी सैन्यात प्रवेश केला आणि सलग २० वर्षे देशाच्या सीमांचे रक्षण केले. सैन्यदलातून निवृत्ती नंतर त्यांनी पोलीस दलात प्रवेश करत २० वर्षे पोलीस निरीक्षक म्हणून कर्तव्यदक्ष, प्रामाणिक अधिकाकरी म्हणून सेवा दिली. त्यांनी आपल्या आयुष्याची ४० वर्षे देशाच्या आणि जनतेच्या सुरक्षेसाठी समर्पित केली असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमास डॅा. जी. बी. कमळकर, सारिका कासोटे, जे. टी. निकम, उपसरपंच शुभांगी पाटील, दतात्रय पाटील, मारूती पाटील, सतीश माने, तुकाराम मगदूम, आप्पासाहेब पाटील, डी. डी. पाटील, जयसिंग पाटील, मधुकर जाधव,.शिवम तळेकर, शिवानी तळेकर , संभाजी लोखंडे, विजय तळेकर, आनंदा पाटील यांच्यासह सैन्य व पोलिस दलातील मान्यवर उपस्थित होते. स्वागत माया तळेकर यांनी केले. आभार एकनाथ मगदूम यांनी मानले.
…………….












